
दोडामार्ग : रेड सॉईल स्टोरीचे शिरीष गवस यांच्या निधना नंतर आमदार दीपक केसरकर यांनी गवस कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी गवस कुटुंबियांना केसरकर यांनी धीर दिला.
प्रसिद्ध रील्स स्टार दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटये येथील शिरीष गवस याचे दोन दिवसांपूर्वी अकाली निधन झाले. त्याच्या निधनानंतर सर्वांनी हळहळ व्यक्त केली होती. सोमवारी माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी गवस कुटुंबाची भेट घेत सात्वन केले. यावेळी युवा तालुका प्रमुख भगवान गवस, गुरूदास सावंत, सज्जन धाऊस्कर आदी उपस्थित होते.