
दोडामार्ग : महसूल विभागात गेली अनेक वर्षे उत्कृष्ठ सेवा बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुरस्कार जाहीर केलेत. यात दोडामार्ग तहसीलमध्ये मंडळ अधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या शरद शिरसाट यांना उत्कृष्ठ अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
दोडामार्ग तहसील कार्यालय येथे मंडळ अधिकारी म्हणून काम करणारे शरद शिरसाट यांनी देश सेवा सेवा केल्या नंतर महसूल विभाग मध्ये सेवा करण्याचे ठरविले. महसूल विभाग मध्ये प्रथम तलाठी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. गाव पातळीवर तालाठी चे योग्य पद्धतीने कामा केल्या नंतर त्यांची पदोन्नती होऊन ते मंडळ अधिकारी झाले.
मंडळ अधिकारी म्हणून त्यांनी दोडामार्ग तालुक्यात चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखाल घेऊन सिधुदुर्ग जिह्वाधिकारी अनिल पाटील यांनी उत्कृष्ठ अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर केला. शुक्रवारी ०१ ऑगस्टला महसूल दिना निमित्त त्यांना हा पुरस्कार सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधिकारी साटम यांचा हस्ते प्रदान करण्यात आला.