
दोडामार्ग : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत विकास सावंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सुरेश दळवी यांनी रविवारी २० जुलै रोजी दोडामार्ग येथे आपल्या कार्यालयात शोकसभा आयोजित केली आहे. सकाळी १०.३० वाजता दोडामार्ग तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरेश दळवी यांनी केले आहे.