
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात शक्य होईल तेवढ्या शाळकरी आणि गरजू मुलांना कपडे वाटण्याचा निर्धार " दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपने केला होता. त्या अनुषंगाने तळकट ग्रामपंचायत मध्ये कपडे वाटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास तेथील पंचक्रोशीतील अनेक युवक उपस्थित होते, बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली, अनेक युवा वर्ग हेल्पलाईनच्या या सर्व समाजउपयोगी कामात सहभागी होण्यासाठी इच्छुक झाले.
तळकट आणि पंचक्रोशीतील प्रत्येक गावांत हेल्पलाईन ग्रुप स्थापन करणे आजची गरज आहे,असा निर्धार उपस्थित युवा वर्गाने केला. यावेळी दोडामार्ग ता. हेल्पलाईन ग्रुप अध्यक्ष वैभव इनामदार, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, कळणे सरपंच.अजित देसाई, रवींद्र खडपकर, कृष्णा दळवी. कुंब्रल उपसरपंच अमित सावंत, तळकट ग्रामपंचायत सदस्य विवेक मळीक, गोविंद गवस, महानंद शेट्ये , प्रकाश गवस, प्रज्योत देसाई, चंद्रहास राऊळ, विकास सावंत, सिद्धेश देसाई, अमोल मळीक, रजत देसाई, सतिश देसाई, राघोबा राऊळ, दर्शन राऊळ, चेतन पास्ते, प्रवीण नाईक, राजेश लांबर आदी उपस्थित होते.