
दोडामार्ग : तळकट कोलझर रस्त्यावर तळकट वनबाग येथे सायंकाळी झाड पडून वाहतूक ठप्प झाली. यावेळी स्थानिकांच्या सहकार्यातून झाड बाजूला करून उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तळकट वनबाग येथे शुक्रवारी सायंकाळी आकेशीचे झाड अचानक मोडून तळकट कोझर रस्त्यावर पडले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तळकट कोलझर येथील वाहन चालक व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विगाला रस्त्याच्या दोन्ही बाजूची धोकादायक झाडे तोडण्यास सांगून देखील बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. एकतर धिम्या गतीने सुरु असलेले रस्त्याचे काम आणि त्यात रस्त्यावरची धोकादायक झाडे यामुळे पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे कुचकामी काम चव्हाट्यावर आले आहे. आता तरी बांधकाम विभागाने जागे होऊन धोकादायक झाडे तोडून सहकार्य करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.