
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात कित्तेक वर्षे रिक्त असलेले स्त्री रोग तज्ञ पद अखेर पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. डॉ. मसुरकर यांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे कायमस्वरूपी म्हणू स्त्री रोग तज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अनेक समस्या बद्दल चर्चा झाली. दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपच्या मागणीला यश आले आहे. त्यामुळे तालुका हेल्प लाईन गृप तर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.
गुरुवार दि. २७ मार्च २०२५ रोजी कर्तव्यदक्ष पालकमंत्री नितेश राणे यांचा जनतादरबारात, डायलेसिस सेंटर, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर, हृदय रोग तज्ञ डॉक्टर, इत्यादी पदे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालायत रिक्त होती. त्यामुळे येथील जनतेचे व रुग्णाचे मोठे हाल होत होते. याच पश्वभूमीवर हेल्प लाईन गृपने या मागण्या केल्या होत्या. अवघ्या काही दिवसातच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे लगेच डायलेसिस सेंटरचे काम चालू झाले. आता स्त्री रोग तज्ञ डॉ. मसुरकर यांची दोडामार्ग रुग्णालयात नियुक्ती करून आरोग्याच्या दृष्टीने दोन मागण्या पूर्ण झाल्या. उर्वरित मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील असा विश्वास हेल्पलाईन ग्रुप मध्ये निर्माण झाला आहे. नवीन वार्डनिर्मिती बाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे.
यावेळी दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार, सचिव भूषण सावंत, उपाध्यक्ष शैलेश गावडे, खजिनदार दया गवस, मनीषा नाईक सदस्य. साक्षी नाईक सदस्य बाळा गवस, सदस्य संदेश गवस, सदस्य मिलिंद नाईक, सदस्य कृष्णा दळवी, सदस्य अशोक नाईक, सदस्य दीपक गवस, सदस्य प्रदीप गावडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.