
दोडामार्ग : स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी तयारीला लागा आमच्या बरोबर कोणी येऊ अगर नको येऊ दोडामार्ग तालुक्यात आपण घवघवीत यश मिळवू. संघटना वाढीसाठी बूथ नुसार काम करा यश आपलेच आहे. असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.
भाजप पक्ष कार्यकर्ता बैठक व पक्ष प्रवेशावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस महेश सारंग, विजय कुमार मराठे, रमेश दळवी, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, चंदू मळीक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी तालुका प्रमुख सुधीर दळवी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.