
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा मार्गावर सासोली येथे सरपंच बळीराम शेटये यांच्या अंगणातील पत्र्याच्या शेडला कँटरने जोरदार धडक दिली. या अपघातात सरपंच शेटये यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. अपघातात शेड पूर्णतः तुटून पडली व अंगणात असलेल्या चारचाकीला धडक बसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशिकी, गोवा येथून माल भरून दोडामार्ग मार्गे बांद्याच्या दिशेने जाणारा कँटर ससोली येथे एका वळणावर आला असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्या लगतच्या सासोली सरपंच बळीराम शेटये यांच्या घराच्या अंगणात घुसला. त्यांच्या अंगणातील पत्र्याची शेड तुटून पडली. ही धडक एवढी जबरदस्त होती की शेडचे पोल तुटून खाली पडले. पत्र्यांचा अक्षरशः चुराडा झाला. तसेच त्यांच्या पत्नी घराच्या ओरांड्यात उभी असताना तिच्या हातावर घराची कौले पडल्याने ती किरकोळ जखमी झाली.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ म्हणाले की सासॊली सरपंच यांच्या घरात समोरील वळण हे धोकादायक आहे. यापूर्वी ही त्या ठिकाणी बरेच अपघात झालेत. आजचा अपघात पाहता शेटये कुटुंब बालंबाल बचावले असल्याच ग्रामस्थांनी सांगितलं.