
दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल दोडामार्ग मधील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज आंदोत्सव साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटत आंदोत्सव साजरा केला. पिंपळेश्वर चौक ते पक्षाचे कार्यालय परिसरात या सर्वांनी रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाच्या घोषणा देत हा आनंद साजरा केला.
यावेळी यावेळी तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिला तालुकाध्यक्ष दीक्षा महालकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, शहराध्यक्ष राजेश फुलारी, माजी तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, नगरसेविका संध्या प्रसादी, क्रांती जाधव, गौरी पार्सेकर, गटनेते नितीन मणेरीकर, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर, चंदू मलिक, संजय सातार्डेकर, सुनील गवस, स्वप्नील गवस, आनंद तळणकर, वैभव इनामदार, सिद्धेश पांगम, आदी उपस्थित होते.