अनुजा देसाईचे ‘जेईई’ परीक्षेत उज्‍ज्‍वल यश

Edited by:
Published on: June 26, 2025 19:25 PM
views 585  views

दोडामार्ग :  तालुक्‍यातील हेवाळे गावची कन्‍या अनुजा मनोहर देसाई हिने ‘जेईई’ परीक्षेत उज्‍ज्‍वल यश संपादन करून ५८८वी रँक मिळवत ‘आयआयटी दिल्ली’मध्‍ये पुढील शिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. 

अनुजाचे प्राथमिक शिक्षण दोडामार्ग तालुक्‍यातील सोनावल शाळेत झाले. त्‍यानंतर पाचवी पास होऊन तिने सांगेली येथील नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला. दहावीमध्‍ये तिला ९८.०६ टक्‍के तर बारावीमध्‍ये ९५.०६ टक्‍के गुण आहेत. तिच्‍या या निवडीबद्दल सर्वच स्‍तरातून अभिनंदन होत आहे.