मंत्री नितेश राणेंचा वाढदिवस

दोडामार्ग भाजपकडून फळ वाटप
Edited by: लवू परब
Published on: June 23, 2025 15:24 PM
views 134  views

दोडामार्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग भाजपकडून ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला. नितेश राणे यांना दीर्घाआयुष लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना केली.

पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्या भरात साजरा करत असताना दोडामार्ग भाजप कडून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुकाध्यक्ष दीपक गवस, युवा मोर्चा तालुका ध्यक्ष पराशर सावंत, खोकरल सरपंच देवा शेटकर, शहर प्रमुख राजेश फुलारी,परमे सरपंच प्रथमेश मणेरीकर, आकांक्षा शेटकर आदी उपस्थित होते.