
दोडामार्ग : सर्पमित्र विराज नाईक यांनी गुरुवारी दि.१९ रोजी दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे सुमारे १०-११ फूट लांबीचा किंग कोब्रा पकडून वन खात्याच्या स्वाधीन केला. विर्डी येथे किंग कोब्रा असल्याची माहिती साहिल गावस याने विराजला दिल्यानंतर विराजने तेथे दाखल झाला व मोठ्या शीथापिने किंग कोब्रा ला रेस्क्यू केले.
विराजने एका महिन्याअगोदर गोवा केरी-सत्तरी येथेही ८-९ फूट लांबीचा किंग कोब्रा पकडला होता. त्याने आजवर अनेक किंग कोब्रा व विषारी, बिनविषारी साप पकडले असून नागरिकांना आपत्कालीन स्थितीत विराजचे मोठे सहकार्य मिळत असल्याने समाधान व्यक्त होतं आहे. किंग कोब्रा म्हटल्यावर अनेकांच्या उरात भरणारी भीतीची धडकी आणि त्यावर मात म्हणजे विराज शी संपर्क यामुळे त्या पंचक्रोशीत लोकवस्तीत येणाऱ्या अनेक सापाना जीवदान मिळू लागले आहे.