
दोडामार्ग : अजित पवार गट राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस सिधुदुर्ग उपाध्यक्षपदी मानसी देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. तर दोडामार्ग महिला तालुका अध्यक्षपदी धारिणी देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालय येथे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष प्रज्ञा परब यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नियुक्ती पत्र प्रज्ञा परब यांच्याहस्ते देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, महिला तालुका अध्यक्ष सिद्धी परब, वेगुर्ले तालुक्यातील महिला पदाधिकारी, दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष साबाजी सावंत, तुषार भोसले, तसेच इतर महिला बहुसंख्येनं उपस्थितीत होत्या.