तोल जाऊन कालव्यात पडली ; आजीचा मृत्यू

Edited by: लवू परब
Published on: June 20, 2025 17:54 PM
views 289  views

दोडामार्ग : तिलारीच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या काव्यात कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोरुद्ध महिलेचा तोल जाऊन पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.  सुलोचना प्रभाकर साळकर ( ८० ) अस तीच नाव आहे. तिलारी कालव्याचे पाणी बंद करून शुक्रवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की सुलोचना साळकर ही महिला गुरुवारी दुपारी आपल्या शेताकडे काम करण्यासाठी गेली होती.  तिलारिच्या कालव्याच्या बाजूला काम करत असताना पाय घसरून तिचा तोल गेला आणि ती थेट कालव्यात पडली. ती उशिरा सायंकाळ घरी आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तर ती सापडली नाही यावेळी ती कालव्यात पडली असेल असा संशय व्यक्त केला. व तसे तिलारी विभागाला यांची कल्पना देऊन तिलारीच्या कालव्याचे पाणी रात्री बंद करण्यास लावले सकाळी शोधा शोध केली असता त्या वयोरुद्ध महिलेचा मृतदेह निदर्शनास आला. ही घटनेची माहिती दोडामार्ग पोलिसांना देण्यात आली. त्या नंतर दोडामार्ग पोलीस घटना स्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदना साठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तिच्या पश्चात नवरा, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.