काय ते करून घ्या..! ठेकेदाराचे शेतकऱ्याला उत्तर

उपोषणाच्या इशाऱ्याने शेतकऱ्याचे प्रत्युत्तर
Edited by:
Published on: June 20, 2025 17:14 PM
views 233  views

दोडामार्ग : स्वतःच्या शेत बागायती मधून विद्युत वाहिन्या व पोल उभारणीसाठी हरकत घेत असता महावितरणच्या दोडामार्ग कार्यालयातील कर्मचाऱ्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याची लेखी तक्रार दोडामार्ग मधील वैभव उल्हास गवस यांनी उपअभियंता महावितरण यांच्याकडे केली आहे. सदर कर्मचाऱ्याची बदली न केल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही गवस यांनी दिला आहे 

याबाबत गवस यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ते कसई - दोडामार्ग मधील रहिवासी तथा शेतकरी असून त्यांची सर्वे क्रमांक 264/7 ही कसई येथे शेती बागायती आहेत. या ठिकाणी गवस यांच्या मालकीची काजू आंबा नारळ सुपारी आधी झाडे तसेच भात शेती देखील आहे. महावितरणच्या दोडामार्ग उपविभागात पराग शिरधनकर हे व त्यांचा ठेकेदार वीज वाहिन्या तसेच पोलसह ते काम करण्यासाठी या जमिनीत आले असता वैभव गवस यांनी त्यांना आपल्या जमिनीतून हे काम करण्यास आपली हरकत असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी आपण लेखी स्वरूपात आपली हरकत नोंदविली असल्याचेही स्पष्ट केले.

मात्र, शिरधनकर यांनी वैभव गवस यांना उद्धट उत्तरे देत तुम्ही कोण? आम्ही तुम्हाला ओळखत नाही. तुमचा काय संबंध ? तुमची जमीन कशावरून असे विचारत तुम्ही काय ते करून घ्या अशा शब्दात शिरधनकर यांनी चुकीची वर्तणूक दिली. त्यांनंतर लागलीच महावितरणच्या कार्यालयात जाऊन शिरधनकर यांच्या बाबत व आपल्या जमिनीतून वीज वाहिन्या व पोल उभारण्यास आपली हरकत नोंदवल्याचे सांगितले आहे.