
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग येथील तुकाराम महादेव गवस यांची विहीर नुकत्याच झालेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी कोसळली. तेथे मोठा गोलाकार खड्डा पडला आहे. विहिरीच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कसई - दोडामार्ग शहरातील तुकाराम गवस यांची स्वमालकीची विहीर आहे. मागील काही दिवसांपासून जोराचा पाऊस पडत असल्याने विहिरीच्या बाजूची जमीन खचली आहे. सोमवारी बांधकाम केलेली विहिरी अक्षरशः जमीनदोस्त झाली. विहिरीवर टाकण्यात आलेली विद्युत मोटार पाईपसह जमिनीत गाढली गेली आहे. संबंधित शेतकऱ्याने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.