शैक्षणिक दाखले विनाविलंब देण्याची मागणी

Edited by: लवू परब
Published on: June 03, 2025 15:38 PM
views 191  views

दोडामार्ग : दहावी बारावीचे निकाल लागल्या नंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी मुलांना महसूल कडून देण्यात येणारे दाखले कोणत्याही त्रुटीशिवाय किंवा ऑनलाईन नसेल तर ऑफलाईन पद्धदतीने द्या जेणेकरून मुलांना ऍडमिशन घेताना कोणत्याही अडचणी येता नये. यासाठी दोडामार्ग युवासेनेच्या वतीने दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन देत  याबबतची मागणी केलीय.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, दोडामार्ग तालुका हा अतिदुर्गम भाग आहे. मांगेली, तेरवण हेवाळे, झोळबे आदी लांब गावातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले घेण्यासाठी तहसील मध्ये येतात. दाखले घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन साईड बंद, किंवा गावचे तालाठी ऑफिसला नाही, अपुती कागदपत्रे या सर्वबाबींकरिता शाळकरी मुलांना पुन्हा पुन्हा तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे  लागतात. त्यामुळे लांब गावातून व इतर गावातून येणाऱ्या शाळकरी मुलांना तात्काळ दाखले द्यावे अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी उबाठा दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, संदेश राणे, भिवा गवस, प्रदीप सावंत, काका नाईक आदी उपस्थित होते.