
दोडामार्ग : दहावीचा रिझल्ट लागल्या नंतर विविध उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु आहे. मेरिट लिस्ट नुसार अनेक ठिकाणी विद्यार्थी प्रवेशाच्या याद्याही लागल्या आहेत. त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील कुडासे सरस्वती विद्यामंदीरात विविध गावातून विद्यार्थी प्रवेश घेतं आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळाला आहे. त्यांनी निश्चिंत रहावे प्रवेश घ्यावा. त्या विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था केली जाईल, असे आवाहन शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केले आहे.
दोडामार्ग तालुक्यात शैक्षणिक स्तर उंचावत असताना अशा होतकरू मुलांना पाठींबा देणं गरजेचं आहे त्यामुळे कुडासे येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थेत मदत केली जाईल असे बाबूराव धुरी म्हणाले.