दोडामार्गमध्ये तिरंगा रॅली

सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान... !
Edited by: लवू परब
Published on: May 26, 2025 13:43 PM
views 73  views

दोडामार्ग : सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान ! असं म्हणत 'ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली'  दोडामार्ग शहरात सर्व नागरिकांनी एकजुटीने भर पावसात तिरंगा रॅली यशस्वी केली. काश्मीरमध्ये निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणारे दहशतवादी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांना जबरदस्त तडाखा देणार्‍या भारतीय सैन्यबलांचे अभिनंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दोडामार्ग शहरात 'ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली' मोठ्या उत्साहात संपन्न केली. या रॅलीत दोडामार्ग तालुक्यातील व परिसरातील बंधूभगिनी जाती, धर्म व पक्षीय भेदाभेद विसरून एकजुटीने केवळ भारतीय म्हणून हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. 

"भारत माता की जय, वंदे मातरम,हम सेना के साथ है, ऑपेरेशन सिंदूर के साथ है अशा घोषणा देत रॅली उत्साहात भर पावसात मोठ्या उत्साहात दोडामार्ग बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.भारतावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा सीमेवरील सैनिकांच्या पाठीशी देशातील प्रत्येक नागरिक उभा राहिला आहे. यावेळी भारतीय जवान आणि भारत सरकार यांच्या पाठीशी जनता कायम असणार असा संदेश यातून देण्यात आला आहे. यापुढेही आपण हीच एकजूट कायम ठेवावी असे आवाहन या प्रसंगी केले. यावेळी माजी जिप उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, नगर

नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, नहरसेवक नितीन मणेरीकर, शहर प्रह्मख राजेश फुलारी, पराशर सावंत वैभव इनामदार, गावडे सर, महिला तालुका अध्यक्ष दिक्षा महालकर, नगरसेविका संध्या प्रसादी, क्रांती जाधव, आकांशा शेटकऱ,  रंगनाथ गवस, सुनील गवस, संतोष म्हावळणकर, प्रकाश गवस, भैया पांगम, संजय सातार्डेकर, सुमित गवस, चंदू मळीक आदी उवस्थित होते.