
दोडामार्ग : पणतूर्ली राऊळवाडी येथील श्री सातेरी देवी पंचायतन देवस्थानचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याच्या आज सोमवारी १२ मे रोजी दुसऱ्या दिवशी विधिवत आचार्य वरण प्राकार शुद्धी मंडप प्रतिष्ठा देवतांची स्थान विधिमंडप देवता पूजनाने सुरवात करण्यात आली. सोमवार १२ मे ते बुधवार १४ मे या चार दिवसाच्या कालवाधित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सोमवारी दुपारी १. ०० महाप्रसाद, ४. ०० वाजता सिद्धिविनायक भजनी मंडळ दोडामार्ग यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळची महिलांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. तसेच ७. ०० वाजता वासुदेव गवस श्रोत्रीय भ्रमभानिष्ठ सद्गुरू काढशीद्धेशवर महाराज कणेरी मठ कोल्हापूर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच मंगळवार दि १३ मे रोजी सकाळी ८ ते ०१. ३० पर्यँत देवता पूजन अग्निपूजन गृहपूजन वास्तु गृह पर्याय व मुख्य देवता भवन होणार आहे, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ४. ०० वाजता गुरुकृपा प्रसादिक भजन मंडळ हवेली घोडेमुख यांचा भजनाचा कार्यक्रम सादर होणार आहे, व रात्री ८. ०० वाजता गावातील विशेष कार्यक्रम होणार आहे.
बुधार १४ मे रोजी म्हणजे शेवटच्या दिवशी सकाळी ८. ०० ते दुपारी १. ०० वाजता मंडप देवता पूजन ओम विठदेवता भवन शिखर प्रतिष्ठान कलशारोहण मुख्य देवता प्रतिष्ठापना सत्व देवतांना चढवून प्राणप्रतिष्ठा महापुजन पूर्णहुती, आरती, गाऱ्हाणे, महाप्रसाद कार्यक्रम सांगता, दुपारी महाप्रसाद, ५. ३० वाजता स्वरानंद गोमंतकातील नामवंत कलाकार, गायिका भावना कोरगावकर, गायक विठ्ठल राऊळ, श्रद्धा आरोंदेकर, ममता राऊळ, यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच ८. ०० वाजता सत्कार समारंभ,व रात्री १२ वाजता मामा मोचेमाडकर दशावातर नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे तरी या चार दिवस होणाऱ्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे.