
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पुन्हा आरोग्याच्या बाबतीत व्हेंटीलेटरवर असून 108 रुग्णावाहिका बंद आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती, आपत्कालीन स्थिती असे पाहता सध्या या रुग्णवाहिकेची गरज असून तात्काळ दुसऱ्या रुग्णावाहिकेची सोय करा यासाठी बाबुराव धुरी यांनी आपत्कालीन समन्वयक तळगावकर यांना धारेवर धरतं त्यांना जाब विचारला. एका तासात सदर रुग्णवाहिका दोडामार्ग मध्ये दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यात कायम आरोग्याचा प्रश्न एरणीवर असतो अशात दिवसाकाठी दोन ते चार रुग्ण गोव्यात अधिक उपचारासाठी नेले जातात, यात जास्त रुग्ण हे गंभीर स्वरूपाच्या आजाराचे असतात यात 108 रुग्णवाहिला बंद असल्याने दोडामार्गची लाईफ लाईन बंद पडल्याचे दिसत आहे, यामुळे तात्काळ पर्यायी 108 रुग्णवाहिका द्यावी अशी मागणी बाबुराव धुरी यांनी केली आहे.