तिलारी घाटात ट्रक पलटी

Edited by:
Published on: April 13, 2025 17:47 PM
views 309  views

दोडामार्ग : तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे माल वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. मालासह गाडीचे मोठे नुकसान झाले‌ आहे. सुदैवाने चालक व वाहक यातून बचावले. रविवारी दुपारी २ वा.च्या सुमारास अपघात झाला.

कोल्हापूरहून एक ट्रक कांदा घेऊन गोव्याला जाण्यासाठी तिलारी घाट मार्गे येत होता. रविवारी दुपारच्या सुमारास तिलारी घाट उतरत असताना जयकर पाॅईंट  येथील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. यावेळी ट्रकमधील काही कांदे इतरत्र पसरले. सुदैवाने तो खोल दरीत कोसळण्यापासून बालंबाल बचावला. चालक व वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात मालासह ट्रकाचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यातच ट्रक पलटी झाल्याने एकेरी वाहतूक सुरू होती.