
दोडामार्ग : सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग च्या वतीने दोडामार्ग तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित हिंदुस्थानी खुल्या "सुगम संगीत" गायन स्पर्धेचे रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी श्री देव खंडोबा सभागृह, सरगवे, झरे २, पुनर्वसन, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग याठीकाणी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत नावं नोंदणी करून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कलाकारांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने "खुली सुगम संगीत गायन स्पर्धा" व वैयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ऐनवेळी काही तांत्रिक अडचणी आल्यास स्पर्धेमध्ये बदल करण्याचा अधिकार संयोजकांनी राखून ठेवला आहे.
स्पर्धेसाठी पारितोषिक पुढीलप्रमाणे :- खुली वैयक्तिक नृत्य स्पर्धा :-* प्रथम पारितोषिक रु.५०००/- आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र, व्दितीय पारितोषिक - रु.३०००/- आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक - रु. २०००/- आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र
खुली सुगम संगीत गायन स्पर्धा :-* प्रथम पारितोषिक रु.५०००/- आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र, व्दितीय पारितोषिक रु.३०००/- आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र,तृतीय पारितोषिक रु. २०००/- आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र
खुली "सुगम संगीत" गायन स्पर्धा व वैयक्तिक नृत्य स्पर्धा नियम व अटी
▪️गायन व नृत्य स्पर्धा हि खुली असुन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना कोणतेही बंधन असणार नाही.
▪️पूर्ण स्वरुपात भरलेले प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.
▪️सहभागासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख बुधवार दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत आहे.
▪️सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्या स्पर्धाकांना रोख रक्कम, सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवीण्यात येईल.
▪️स्पर्धेच्या ठिकाणी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था असेल. (स्पर्धक व संबंधीतांसाठी).
▪️प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या ठिकाणी नियोजित वेळे पूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहून आयोजकांशी संपर्क साधावा. तसेच दिलेल्या वेळेत आपले सादरीकरण करणे बंधनकारक आहे.
▪️स्पर्धेतील गायन व नृत्य सादरीकरणाचे क्रमांक स्पर्धकांच्या समक्ष ड्रॉ टाकून ठरविले जातील.
▪️गायन स्पर्धेतील वाद्य ही पारंपारिक असावीत. इलेक्ट्रॉनिक वाद्याचा वापर करता येणार नाही.
▪️प्रत्येक स्पर्धकाराने स्वखर्चाने ये - जा करायची आहे.
▪️ नृत्य आणि गायनासाठी वेळ कमीतकमी ४ मि. व जास्तीत जास्त ५ मिनीटांचा राहिल.
▪️कार्यक्रमात प्रसंगानुरुप बदल करण्याचे संपुर्ण अधिकार आयोजकांकडे असतील.
▪️आयोजक आणि मान्यवर परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.
▪️गायन स्पर्धा परिक्षणासाठी स्वर, ताल, लय यासोबतच मांडणी, निवड इ. निकष विचारात घेतले जातील.
▪️गायन स्पर्धेतील स्पर्धकांनी साथसंगीतासाठी तानपुरा आणि तबला याच वाद्यांचा उपयोग करणे अपेक्षित आहे. वाद्य आणि वादक व्यवस्था आवश्यक असल्यास स्वतःचा आणावा किंवा आयोजकांत तर्फे करण्यात येईल.
▪️गायन स्पर्धेतील स्पर्धकांना स्वखर्चाने आपली वाद्य आणि वादक आणण्याची मुभा आहे.
▪️गायन स्पर्धेत स्पर्धकांने भावगीत, अभंग, भक्तिबीत, नागीत या पैकी कोणतेही १ सादर करावे. गौळण, भारुड याचे सादरीकरण स्पर्धेत नसावे. ते ग्राह्य धरले जाणार नाही. नाटकातील अभंग चालतील.
▪️स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने स्पर्धेचा निकाल जाहिर केला जाईल. याच वेळी बक्षीस वितरण सोहळा पार पडेल.विजेत्या स्पर्धाकांनी बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित राहून आपले बक्षीस स्वीकारायचे आहे.
▪️स्पर्धेतील विजेता स्पर्धक बक्षीस वितरण सोहळ्ळ्या प्रसंगी उपस्थित न राहिल्यास त्यांनी आपले बक्षीस येत्या आठ दिवसात घेऊन जायचे आहे. त्यानंतर आयोजक जबाबदार राहणार नाही.
▪️गायन व नृत्य स्पर्धेसाठी प्रवेश फी रक्कम रुपये २०० आहे. नृत्य स्पर्धेतील स्पर्धकाला त्याच्या आवडीच्या कोणत्याही गाण्यावर नृत्य करता येईल,परंतु निवडलेले गाणे दुसऱ्या स्पर्धकाने घेतलेले नाही याची स्पर्धेसाठी नाव नोंदणी करताना खात्री करून घ्यावी.
▪️नृत्य स्पर्धेतील स्पर्धकाने निवडलेले गाणे संबधित उपकरण नृत्याच्या पूर्वी परिपूर्ण करून आणणे.
▪️रविवार दि. ४ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वा.सुगम संगीत गायन स्पर्धा तर सायंकाळी ४.०० वा.वैयक्तिक नृत्य स्पर्धा सुरु होईल.
▪️प्रवेश फी पाठविण्या करिता GP: 9763379306
नृत्य आणि गायन स्पर्धेला आर्थिक मदतीची आवश्यकता
सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. मंचाच्या वतीने नुकताच सांस्कृतिक लोककला महोत्सव संपन्न झाला. दोडामार्ग तालुक्यातील विविध गावातील विविध लोककला पथकानी सहभाग घेऊन आपली कला सादर केली. मोठया संख्येने उत्स्पुर्त सहभाग घेतला होता. यानंतर मंचाच्या माध्यमातून खुली गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही कार्यक्रम यशस्वी करत आहोत. असच सहकार्य या कार्यक्रमाला आर्थिक स्वरूपात हाताभार लावावा. यासाठी Gpay: 9763379306 हा आहे.यावर आर्थिक मदत करावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
नाव नोंदणी, प्रवेश फॉर्म व अधिक माहितीसाठी संपर्क : अध्यक्ष : शंकर जाधव ९७६३३७९३०६/ ९४२३५१५०११, सचिव : सागर नाईक ७५९७६९६३७४, खजिनदार : महेश पारधी ९४२९२६५८९६, सल्लागार : संजय सुतार ८७८८३९९७६९, सहसचिव : विलास आईर ८६५७६९९५७०