कर वसुलीसाठी दोडामार्ग नगरपंचायत ॲक्शन मोडवर

Edited by:
Published on: March 18, 2025 17:26 PM
views 116  views

दोडामार्ग : मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुली करणेकरिता कसई दोडामार्ग नगरपंचायत प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून, कर बुडविणाऱ्या मालकांच्या मलमत्तेवर सील मारण्याची धडक मोहीम सुरु केली आहे. मार्च एन्ड आल्याने नगरपंचायत प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून नागरिकांना सर्व प्रकारे कर भरणा करणेसाठी आवाहन केलं जातं आहे. जे लोग वर्षांनुवर्षे दाद डेत नाही अशांच्या मालमत्ता सील केल्या जातं आहेत. सोमवारी कसई दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाद्वारे  मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुली करणेकरिता मुख्याधिकारी कसई-दोडामार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.

यावेळी ३ घरांची पाणीपट्टी थकीत असल्याने त्यांची नळजोडणी तोडण्यात आली.  तर एका फ्लॅटचा इमारत कर न भरल्याने तो फ्लॅट तथा मालमत्ता नगरपंचायत अधिकाऱ्यांनी सिल केला आहे. यावेळी कार्यालय अधीक्षक दिपाली मुंडये, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत पिळणकर, स्वच्छता निरीक्षक निवेद कांबळे, लिपिक  संजय शिरोडकर, पंप ऑपरेटर  सुभाष केतकर, व्हॉल्वमन  प्रथमेश चव्हाण,  स्वनिल सावंत, नगरपंचायत कर्मचारी श्रीम. प्रणाली शेटकर, वैष्णवी गवस आदि उपस्थित होते.