कसई - दोडामार्ग न.पं.च्या मच्छी मार्केट इमारतीचं लोकार्पण !

Edited by: लवू परब
Published on: August 08, 2024 11:16 AM
views 296  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या मच्छी मार्केटच्या नवीन इमारतीचे बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर नगरध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून लोकर्पण करण्यात आले. 

कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या मच्छी मार्केटच्या नवीन इमारतीचे आज बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. नवीन विहिरीचे पूजन करताना नगरसेविका संध्या प्रसादी यांनी केलं. यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संजू परब, जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरपंचायत अधिकारी शहरातील नागरिक, महिला वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.