दोडामार्गात २५० उद्योजकांचा मेडिकल उद्योग हब बनविणार : नारायण राणे

Edited by: संदीप देसाई
Published on: August 25, 2023 11:07 AM
views 528  views

संदीप देसाई | दोडामार्ग :  तुम्ही खरे भाग्यवान असून येणारा भविष्यकाळ हा दोडामार्ग वासीयांसाठी अत्यंत उज्वल आहे. मी बोलणार नाही तर करून दाखवणार असे सांगत दोडामार्गमध्ये उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मेडिकल साहित्य बनविणारे तब्बल अडीचशे मोठे उद्योग राज्य सरकारला सोबत घेऊन इथे सुरू करून दोडामार्गात मेडिकल उद्योग हब बनविणार असल्याच प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोडामार्ग येथे केले. मला फक्त थोडा वेळ द्या, पण मी हे शंभर टक्के आणणार, काळजी करू नका. इथला कायापालट आम्ही करणार आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणणार असा शब्द दोडामार्ग तालुक्याचे शिल्पकार नारायण राणे यांनी दोडामार्ग वासीयांना दिला आहे.

कसई - दोडामार्ग नगरपंचायतसाठी 3 कोटी इतक्या निधीतून मंजूर असलेल्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीच भूमिपूजन गुरवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री राणे यांच्या विशेष उपस्थीतीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शानदारपणे पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,  नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंखे यांसह बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव, नगरसेविका संजना म्हावळनकर, सुकन्या पनवेलकर, क्रांती जाधव,  मयेकर,  नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, चंदन गावकर, संतोष नानचे, राजेश प्रसादि, संध्या प्रसादी, सोनल म्हावळनकर, रामचंद्र ठाकुर, भाजपा सेना पदाधिकारी राजन म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, राजू निंबाळकर, सुधीर दळवी, गणेशप्रसाद गवस, रमेश दळवी आदि उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना नामदार राणे यांनी येणारा काळात दोडामार्गसाठी उद्योगांचे माहेरघर असेल असे सांगताना दोडामार्गच्या जमेच्या बाजू विशद केल्या. दोडामार्गपासून अवघ्या अर्ध्या तासावर इंटरनॅशनल विमानतळ, रेल्वे सेवा, रेडी पोर्ट आणि उत्तम रस्ते यामुळे जगभरातील गोव्यात उतरणारे पर्यटक निछित दोडामार्ग मध्ये येतील. येत्या काळात येथे हॉटेल इंडस्ट्रीज उभी राहील. ज्या या पायाभूत सुविधा दोडामार्ग लगत आहे. अशा अन्य कोणत्या तालुक्यात आहेत असा सवाल उपस्थित करत, याच तकादीवर येत्या काळात येथे हॉटेल इंडस्ट्रीज उभी राहील, उद्योजक येथील आणि त्यातून हजारो रोजगार उपलब्ध होऊन दोडामार्गाचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नगराध्यक्ष व त्यांच्या टिमकडून सुरू असलेल्या लोकाभिमुख कारभाराचे कौतुक केल. आपला कारभार चांगला ठेवून आपली प्रतिमा चांगली ठेवल्यास येत्या काळात त्याचा फायदा होईल. आणि निछितच  आपण ते कराल. असा विश्वास व्यक्त करत सरकार कडून आणि आम्हा तिन्ही मंत्र्याकडून आपल्याला जी जी मदत लागेल ती ती मदत आम्ही करू, असे आश्वासन यावेळी मंत्री चव्हाण यांनी चेतन चव्हाण व त्यांच्या टीमला दिले. 


दोडामार्गवासीयांच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा : दीपक केसरकर 

तर मंत्री केसरकर दोडामार्ग वासीयांच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा असून 3 कोटींची भव्य इमारत या नगरपंचायतला मिळत आहे. येथे पंचायत समिति इमारत मंजूर झालय, नाट्यगृह सुद्धा आम्ही देऊ. तर दोडामार्गात २८ कोटींच उप जिल्हा रुग्णालय सुध्दा होतय. आपल्याला सगळ्यांना मिळून चांगल काम करायच आहे. आडाळीत लवकरच ३०० लोकांना रोजगार देणारा मोठा उद्योग आणि २४ अन्य उद्योग येते येणार आहेत. आपण ज्या तालुक्याची निर्मिती केली तो तालुका सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी आम्ही घेत असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितलं.  

राणेंनी टोचले कान.. म्हणाले नांदा सोख्य भरे 

दोडामार्ग तालुक्यात भाजपचे अंतर्गत वाद अजूनही संपत नसून त्याचा प्रत्यय आजच्या भूमिपूजन कार्यक्रमातही अनेकदा दिसून आला. नेमका तोच धागा पकडून केंद्रीय मंत्री तथा भाजापाचे जेष्ट नेते नारायण राणे यांनी हे वाद आणि गट तट करणार्यांयचे चांगलेच कान टोचले. तालुक्याच्या विकासासाठी एकच वाक्य ... “नांदा सौख्य भरे’, इथे वाद नको, जिथे वाद तिथे प्रगति नाही असे सांगत असे वाद लोकहितासाठी करा. वादाने विकासाला खिल बसते. नंदनवन दोडामार्गचे व्हायचे असेल, सुजलाम सुफलाम व्हायच असेल तर प्रत्येक माणूस इथला सबळ असला पाहिजे. कोणी गाडी घेतली तर नाक मुरडण्या पेक्षा त्याच अभिनंनद्न करण्याचं औदार्य दाखवा, मनाचा मोठेपणा दाखवा. अशा शब्दात ना. राणेंनी त्यांचे कान टोचले.