दोडामार्ग उबाठा सेनेकडून जरांगे पाटिल यांच्या आंदोलनास पाठिंबा

Edited by:
Published on: November 01, 2023 11:38 AM
views 388  views

दोडमार्ग : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटिल यांच्या समर्थनार्थ गुरुवार पासून दोडामार्ग तालुक्यातील उबाठा सेनेकडून मराठा आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत साखळी उपोषण छेडण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी व तालुकाप्रमुख संजय गवस यांनी हे निवेदन दिले आहे.

 याबाबतचे लेखी निवेदन सोमवारी दोडामार्ग तहसिलदार व पोलिसांना दिले आहे. मनोज जरांगे पाटिल हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत. त्यांचं शांततेत आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण ही काळाची गरज असल्याने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उबाठा सेना २ नोव्हेंबर पासून दोडामार्ग येथे साखळी उपोषण सुरू करेल व त्यावेळी काही कायदा सुव्यवस्था प्रश्न सुरू झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा बाबूराव धुरी व संजय गवस यांनी दिला आहे.