
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचा बारावीचा निकाल १००% लागला असून, दोडामार्ग इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या गौरी प्रकाश नाईक 83.50% गुण मिवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर त्याच कॉलेजची गौरवि सूर्याजी गवस 83.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर त्याच कॉलेजचा विद्यार्थी विश्वजीत भिकाजी कळणेकर याने 81.17% गुण मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. गेली सहा वर्षे तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवीत इंग्लिश स्कुल व ज्युनीअर कॉलेज दोडामार्गने प्रथम ३ क्रमांक मिळवून यश संपादन केले. तालुक्यात २७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यात सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
तालुक्यातील एकूण २७१ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज कॉलेज दोडामार्गचे एकूण १६५ विद्यार्थी, सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासेचे ६२ विद्यार्थी व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे ४४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले. काॅलेज निहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे....
१) दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडामार्ग कला शाखा - १०० टक्के - प्रथम प्रांजल जानू फाले ६५.६७ टक्के, द्वितीय संजना महादेव येळुस्कर ६३.८३ टक्के व तृतीय सेलिना पास्कु लोबो ६२.८३ टक्के मिळाले असून एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
वाणिज्य शाखा १०० टक्के - प्रथम गौरी प्रकाश नाईक ८३.५० टक्के, द्वितीय गौरवी सूर्याजी गवस ८३.१७ टक्के व तृतीय विश्वजित भिकाजी कळणेकर ८१.१७ टक्के मिळाले असून ४८ प्रविष्ट झाले होते.
विज्ञान शाखा १०० टक्के - प्रथम अभिजित संजय पिरणकर ८० टक्के, द्वितीय अथर्व संदीप गवस ७६.३३ टक्के व तृतीय नंदा लक्ष्मण गवस ६७.३३ टक्के मिळाले असून विज्ञान शाखेत एकूण ७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
२) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी, कला शाखा १०० टक्के - प्रथम दीक्षा अर्जुन नाईक ६६.५० टक्के, द्वितीय प्रीती रघुनाथ जाधव ६५.६७ टक्के व तृतीय दिपाक्षा देविदास सावंत ६३.१७ टक्के मिळाले असून एकूण २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
वाणिज्य शाखा १०० टक्के - प्रथम शर्वी संजय लोंढे ७२.३३ टक्के, द्वितीय ऋतुजा वामन गवस ७०.८३ टक्के, तृतीय स्नेहा सहदेव नाईक ६९.५० टक्के मिळाले असून २४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.
३) सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स, कुडासे १०० टक्के - प्रथम साक्षी विष्णू घोगळे ६७.१७ टक्के, द्वितीय राहुल रामा सावंत ६५.३३ टक्के व तृतीय श्रीष परेश कडगावकर ६४.६७ टक्के प्राप्त केले आहेत. या विद्यालयातून ६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या संस्थाध्यक्ष, मुख्यध्यापक शिक्षक, व पालकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाललीस शुभेच्छा दिल्या.