दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

प्राथमिक गटात करुणा सदन साटेली-भेडशी, तर माध्यमिक गटात माध्यमिक विद्यालय, झोळंबे प्रथम
Edited by: संदीप देसाई
Published on: January 17, 2023 19:20 PM
views 184  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुकास्तरीय ५० वे विज्ञान प्रदर्शन श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथे मोठ्या थाटात संपन्न झाल्यानंतर या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रदर्शनात तालुक्यात प्राथमिक गटात करुणा सदन स्कूल साटेली-भेडशी, तर माध्यमिक गटात  माध्यमिक विद्यालय, झोळंबे शाळा प्रथम ठरल्या आहेत.

 विज्ञान प्रदर्शनमधील अन्य स्पर्धा व उपक्रमांचा निकाल पुढील प्रमाणे - 

विज्ञानपूरक उपक्रम निबंध स्पर्धा -

 प्राथमिक गट

 प्रथम - चिन्मयी जयसिंग खानोलकर (दोडामार्ग नं. १), द्वितीय - उज्वला पुरुषोत्तम देसाई, करुणा सदन साटेली - भेडशी, तृतीय - दिपाली मुरलीधर भणगे (घोटगेवाडी)

 माध्यमिक गट

प्रथम - पालवी लक्ष्मण मेस्त्री (नूतन विद्यालय कळणे), द्वितीय - नेहा यल्लाप्पा गावडे (दोडामार्ग), तृतीय - नकुशा बाबूराव लांबर (भेडशी).

वक्तृत्व स्पर्धा 

प्राथमिक गट

प्रथम - चिन्मयी जयसिंग खानोलकर, द्वितीय - स्नेहा विशाल सांवत (समाजसेवा हायस्कूल, कोलझर), तृतीय सुचिता सोमनाथ गोंधळी (सरस्वती विद्यामंदिर कुडासे).

माध्यमिक गट 

प्रथम - सौम्या संदेश मणेरीकर (भेडशी), द्वितीय - श्रेयस श्रीकांत गावस (कुडासे), तृतीय - सिद्धी संतोष गवस (बापूसाहेब देसाई विद्यालय, उसप)


प्रश्नमंजुषा स्पर्धा

प्राथमिक गट

 प्रथम - ओम वसंत गवस व वेद दत्ताराम दळवी (करुणा सदन स्कूल, साटेली-भेडशी), व्दितीय दिग्गज दिग्विजय फडके (साटेली-भेडशी), तृतीय यश किशोर म्हापसेकर, हर्ष महेश कासार (दोडामार्ग).

माध्यमिक गट

 प्रथम - अथर्व संदीप गवस व सानिया फर्नांडिस

(करुणा सदन स्कूल, साटेली-भेडशी), द्वितीय - तन्वी प्रेमानंद तळणकर व कोमल कमलाकर मिशाळ (न्यू इंग्लिश स्कूल, दोडामार्ग), तृतीय - प्राजक्ता संतोष गवस व अनया संतोष गवस (श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे),

विद्यार्थी प्रतिकृती

 प्राथमिक गट

 प्रथम - आशिश प्रमोद कुशवाह (करुणा सदन स्कूल, साटेली-भेडशी), द्वितीय - विशाखा सतीश जुवेकर (न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी), तृतीय - गायत्री शंकर गवस (आंबडगाव नं. १), चिन्मयी जयसिंग खानोलकर (दोडामार्ग नं. १).

माध्यमिक गट 

प्रथम - अश्र्वेक आंनद गवस (माध्यमिक विद्यालय, झोळंबे), द्वितीय - गौरी सुनील नाईक (श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे), तृतीय - नूतन संजय च्यारी (माध्यमिक विद्यालय सोनावल).

शिक्षक प्रतिकृती

प्राथमिक गट - 

प्रथम - जयसिंग बळीराम खानोलकर

माध्यमिक गट

प्रथम - विष्णुदास भिवा नाईक, (माध्यमिक विद्यालय, झरेबांबर), द्वितीय - कृष्णा शांताराम नाईक (एम. आर. नाईक विद्यालय, कोनाळकट्टा).

प्रयोगशाळा परिचर प्रतिकृती

माध्यमिक गट - 

प्रथम - बामणी काशिनाथ केरकर (बापूसाहेब देसाई विद्यालय, उसप), द्वितीय  - राजेंद्र  विठ्ठल शेटकर (माध्यमिक विद्यालय, झोळंबे), तृतीय - विष्णू महादेव लोंढे (माध्यमिक विद्यालय मांगेली) आदींनी यश संपादन केले आहे.

या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण आणि समारोपाचा कार्यक्रम  प्रशालेच्या भव्य स्टेजवर शिक्षण महर्षी कै. आबासाहेब तोरसकर विज्ञान नगरीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव गवस (माजी मुख्याध्यापक मडूरा), दोडामार्ग पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नासीर नदाप, समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक, विस्तार अधिकारी दीपा दळवी, केंद्रप्रमुख श्रीम. राजलक्ष्मी लोंढे, सूर्यकांत नाईक, गुरुदास कुबल, अप्पासाहेब हरमलकर, मुख्याध्यापिका स्नेहल गवस आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ स्वयंसेवक - विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक  परेश देसाई यांनी तर मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी आभारप्रदर्शन केले.