शिवसेना दोडामार्ग महिला तालुका प्रमुखपदी चेतना गडेकर

शहर महिला प्रमुखपदी शीतल हरमलकर
Edited by: संदीप देसाई
Published on: March 14, 2023 08:58 AM
views 185  views

दोडामार्ग : बाळासाहेबांची शिवसेना महिला तालुका प्रमुखपदी सौ. चेतना गडेकर यांची तर दोडामार्ग शहर महिला प्रमुख पदी सौ. शितल हरमलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख आ. रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे त्यांना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र  देण्यात आले. 

आ. फाटक हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता दोडामार्ग तालुक्यातील संघटनेच्या विविध पदी कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यात दोडामार्ग तालुका महिला प्रमुख पद व उपतालुकाप्रमुख या पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी, सानवी गवस, रामदास मेस्त्री, संदीप गवस, दयानंद धाऊसकर, गुरू सावंत व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.