
दोडामार्ग : दोडामार्ग सावंतवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 59 पट संख्या असलेल्या शाळेत अजून एक शिक्षक द्या अशी वारंवार मागणी करून देखील शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. बुधवारी 28 ऑगस्टपर्यंत शिक्षक शाळेत रुजू न झाल्यास सर्व मुले व पालक शाळेतच आंदोलन करणार असल्याचा इशारा शाळा व्यवस्थापन कमिटीने गटशिक्षण विभागला दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदना म्हटले की सावंतवाडा येथील प्राथमिक शाळेत 59 पट संख्या आहे. सध्या कार्यरत असलेले 2 शिक्षक यांना मुलांना शिकविणे खूप कठीण होत आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन कमिटीने शिक्षण विभागला निवेदनाद्वारे मागणी केली की अजून एक शिक्षक द्या. मात्र या निवेदनाला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे 28 ऑगस्टपर्यंत म्हणजे बुधवारी सकाळी 10 वाजे पर्यंत जर शाळेत शिक्षक हजर झाले नाही तर त्याच दिवशी सर्व मुलांना व पालकांना घेऊन शाळेतच आंदोलन करणार असल्याचा इशारा शाळा व्यवस्तापन समितीने दिला आहे.