दोडामार्गात आज रंगणार आमदार चषक कबड्डी स्पर्धा !

Edited by: संदीप देसाई
Published on: February 17, 2024 10:00 AM
views 66  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांना कळविण्यात येते आज संध्याकाळी ठीक सहा वाजता  दोडामार्ग जि प प्रा शाळा नंबर 1 च्या  मैदानावर आमदार चषक कबड्डी स्पर्धा चालु होणार आहे. रात्रौ ठीक  8 वाजता  शालेय शिक्षणमंत्री  दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. 

या उद्घाटनाला शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महीला जिल्हाप्रमुख निता कविटकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष राजन पोकळे,  जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, सावंतवाडी विधानसभाप्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुकासंघटक गोपाळ गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, दादा देसाई, मायकल लोबो, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, दोडामार्ग शहर प्रमुख योगेश महाले, युवासेना शहर प्रमुख गोकुळदास बोंद्रे हे उपस्थित राहणार तरी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.