महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील : गणेशप्रसाद गवस

बंडखोरांना मतदारच त्यांची जागा दाखवतील
Edited by:
Published on: February 02, 2026 22:54 PM
views 29  views

दोडामार्ग :

दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी दिलीय.

 केर ग्रामपंचायत परिसरात प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गोवा संपर्क प्रमुख सुभाष सावंत, राज्य प्रमुख उपेंद्र गांवकर, राज्य सचिव काशिनाथ मयेकर, कोनाळ पंचायत समिती उमेदवार सौ. सायली स्वप्नील निंबाळकर, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गंवस, घोडगेवाडी सरपंच सागर कर्पे, श्रीनिवास शेटकर, तुकाराम देसाई (माजी पोलीस पाटील), बापू देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीच्या वतीने भाजपाकडून निवडणूक लढविणाऱ्या सौ. सायली निंबाळकर यांच्या प्रचाराचे काम शिवसेनेचे कार्यकर्तेही मन लावून करत आहेत. मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता दोडामार्ग तालुक्यातील महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  महायुती असतानाही भाजपाचे काही पदाधिकारी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचा उल्लेख करत, अशा बंडखोरांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असा इशारा तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गंवस यांनी दिलाय. तर या प्रचार दरम्यान शिवसेना गोवा संपर्क प्रमुख तथा निरीक्षक सुभाष सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन मजबूत ठेवण्याचे आवाहन केले.