
दोडामार्ग : तालुक्यातील कोनाळकट्टा येथे काळतोंडया साप आढळून आला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी हा साप आढळून आल्याची माहिती सर्प मित्र आबा कापडोस्कर यांनी दिली. सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
काळतोंडया बिनविषारी साप !
सरासरी लांबी २५ ते जास्तीत जास्त ४६ सेमी ( वाळा सापा पेक्षा थोडा मोठा) असते. याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर अगदी बारिक काळे ठिपके असतात. या सापाची विशेष खूण म्हणजे डोके काळे व लांब गोलाकार शरीर असते. हा बिनविषारी जातीचा साप आहे.
या सापाला 'ड्युमेरिल्स ब्लॅक हेडेड स्नेक' या नावानेसुद्धा ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव 'सितिनोफिस सबपंक्टॅटस' असूनयाचे तोंड काळे असल्यामुळे मराठी त्याचे नाव काळतोंड्या अशी पडले आहे. याची सरासरी लांबी २५ ते जास्तीत जास्त ४६ सेमी (वाळा सापा पेक्षा थोडा मोठा) असते. याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर अगदी बारिक काळे ठिपके असतात. या सापाची विशेष खूण म्हणजे डोके काळे व लांब गोलाकार शरीर असते. हा बिनविषारी जातीचा साप आहे.