
दोडामार्ग : घाट माथ्यावरून तिलारी घाटातून गोव्यात गोमांस वाहतूक करणारी कार जाळण्याच्या घटनेनंतर दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिस कर्मचारी याचेंशी झालेली झटापट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने वातावरण तंग झाले होते.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रात्री उशिरा दोडामार्ग पोलिस ठाण्यात भेट देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर नितेश राणे उपस्थित व पत्रकार यांचेशी सवांद साधताना सांगितले की, आपण कोणतीही काळजी करू नका. हिंदू धर्मासाठी काम करणारी आपली मुले जरी पोलिसांच्या ताब्यात असली तरी सर्व सुखरूप आहेत. त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची हमी दिली. तसेच “चांगल्या दर्जाचा वकील देऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले जाईल,” असा शब्द भाजप कार्यकर्त्यांना दिला. यां युवकांनी गोमास तस्करी करणाऱ्याना चांगला धडा दिलाय. या सीमेवरून चांगला संदेश जाईल व असे प्रकार पुन्हा करण्याचे कोणी धाडस करणार नाही, असेही त्यांनी म्हणतं सर्वाना शांततेचे आवाहन केलंय. राज्यात आपली सत्ता असताना आणि पालकमंत्री असताना हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या यां युवकांना कोणाताही त्रास होणार नाही असं स्पष्ट केलं.
या भेटीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप सरचिटणीस महेश सारंग यांसह तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.










