तेरवण पेंढरेवाडीत पत्रा शेडचं भूमीपूजन

आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून मंजुरी
Edited by: संदीप देसाई
Published on: February 16, 2026 17:36 PM
views 42  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील तेरवण पेंढरेवाडी येथे स्थानिक आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या पत्रा शेडच्या कामाचे भूमीपूजन ग्रामस्थांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. डोंगराळ भागातील आणि दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गाव म्हणून ओळख असलेल्या या भागाच्या विकासाला महायुती सरकारच्या काळात गती मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत गावात दोन स्मशानभूमी, सभागृह, पत्रा शेड, नवीन शाळेसाठी वर्गखोली तसेच तेरवण–मढे रस्ता आदी विकासकामे पूर्ण झाली आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी आमदार केसरकर तसेच तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचे आभार मानले.

तेरवण पेंढरेवाडी येथे वार्षिक सत्यनारायण पूजेच्या दिवशी या कामांचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्यावेळी आमदार दीपक केसरकर, गणेशप्रसाद गवस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी विजय खेमाजी गवस यांनी दिली. भूमीपूजन प्रसंगी चंद्रकांत गवस, उमाकांत गवस, गोपाळ गवस, रामा गवस, विश्राम चव्हाण, तुकाराम गवस, गणपत गवस, लाडू गवस, बाळा गवस, गौरव गवस तसेच इतर महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.