मणेरीतील जठार बाबा देवस्थानचा वर्धापन दिन भक्तिभावात

Edited by: संदीप देसाई
Published on: February 16, 2026 16:15 PM
views 50  views

दोडामार्ग : मणेरी येथील जठार बाबा देवस्थानचा वाढदिवस सोहळा सोमवारी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मणेरी जठार बाबा देवस्थान हे सर्वदूर प्रसिद्ध देवस्थान आहे. परिसरातील भाविकांसासोबत लगतच्या गोमंतकीय लोकांचे हे जागृत देवस्थान मानले जाते. जठार बाबाच्या वर्धापन दिनी शेकडो भाविक येथे हजेरी लावून जठार बाबा चरणी मनोभावे लीन होतात. आपले नवस फेडतात. यावर्षीही भाविकानी मोठी गर्दी केली हॊती. 

वर्धापन दिनी पहाटे काकड आरती व अभिषेक, विशेष पूजाविधी व सत्यनारायण महापूजा, पालखी मिरवणूक,भजन, कीर्तन व हरिपाठ तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर देवस्थान परिसर फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. मणेरी वासिय व परब कुटुंबीय तसेच मंडळाचे कार्यकर्ते यांनी भाविकांना दर्शन व महाप्रसाद याचे चोख नियोजन केलं होतं.