साटेली भेडशीत शिवाजी महाराजांचा पुतळा

शिवजयंतीला होणार अनावरण
Edited by: लवू परब
Published on: February 14, 2026 20:24 PM
views 47  views

दोडामार्ग : साटेली भेडशी येथे शुक्रवारी रात्रीच्या दरम्याने सिंहासनावर आरूढ असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णकृती मूर्ती स्थापन केली आहे. या स्मारकाचा अनावरण सोहळा १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी मोठ्या थाटात करण्यात येणार आहे. या अनावरण सोहळ्याला शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन साटेली भेडशी येथील शिवप्रेमींनी केले आहे. 

दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम शिवपाईकांनी  केले आहे. साटेली भेडशी येथे ग्रामपंचायतच्या आवारात महाराजांचे स्मारक उभारले आहे. सिंहासनावर आरुढ झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. शिवप्रेमींनी हाती घेतलेले हे काम केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी व लहान मुलांच्या मनामध्ये शिवप्रेम रुजविण्यासाठी तसेच हिंदवी स्वराज्याची प्रेम भावना निरंतर ठेवण्यासाठी शिवप्रेमी प्रयत्न करीत आहेत.

या स्मारकाचा अनावरण सोहळा शिवजयंती दिवशी १९ फेब्रुवारीला मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडणार असून लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. शिवप्रेमींकडून नियोजनबद्ध कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आलेली असून ढोल पथकांच्या गजरात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्याला तालुक्यातील तसेच विविध भागातील हजारोच्या संख्येने शिवपायिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साटेली भेडशी येथील शिवप्रेमीं कडून करण्यात आलेले आहे.