
दोडामार्ग : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षातील केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धा पारंपारिक उत्साहात दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. “अधिक उंच, अधिक जलद” या घोषवाक्याने प्रेरित होऊन सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा तसेच सांस्कृतिक प्रकारात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. छाया धर्णे, परमे सरपंच प्रथमेश मणेरीकर, कुडासे-वानाेशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशांत चारी, परमे अध्यक्ष आनंद नाईक, बोडदे येथील सौ. साक्षी नाईक, साटेली भेडशीचे अध्यक्ष यरावंत धर्णे, उदय गोलम, रामदास मेस्री, वैभव सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध शाळांच्या व्यवस्थापन समिती सदस्यांसह पालक वर्गाचीही उपस्थिती लक्षणीय होती.
या स्पर्धांचे नियोजन व यशस्वी आयोजन महेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली रामा गवस, निलेश सावंत, वासुदेव चव्हाण, गोपाळ पाटील, सिद्धेश मणेरीकर, मंजुश्री परब, पूनम पालव, दिपक दळवी, दिपक घाडी, सुभाष गेंगजे, शेखर पिसाळ, शेडमाके, ज्ञानेश्वर मंडलिक, माने, तायडे, गावीत आदी शिक्षकांनी केले. केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. या निमित्ताने पालकांनी श्री. नाईक यांनी क्रीडा महोत्सव साजरा करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे विशेष कौतुक केले.










