
सावंतवाडी : आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसची अत्यंत गरज आहे. तिरंगा दौड सारख्या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून ती पूर्ण होते याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगले अधिकारी घडावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे मत हर घर तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग भाजप व महिंद्रा अकॅडमी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा दौड स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथमेश जाधव व मेघा सातपुते यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर लहान गटातून दीप सावंत व सौम्या मेस्त्री हे विजयाचे मानकरी ठरले. लहान गटातून द्वितीय क्रमांक मुले यश कडव, पृथ्वीराज राठोड तसेच मुलींमधून आस्था लिंगवत व मैथिली गावडे तर मोठ्या गटातून मुलगे प्रणव भालेकर द्वितीय प्रशांत सुद्रिक तृतीय तर मुलींच्या मोठ्या गटातून रेश्मा पांढरे द्वितीय तर समीक्षा वर तृतीय यांनी यश मिळवले. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या समोर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. जिल्ह्यातून साडेचारशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन श्री गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर,माजी नगरसेवक मनोज नाईक, जिल्हा बँकेचे संचालक रवी मडगावकर,कझ्युमर्स सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे, महिंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर,सावंतवाडी भंडारी समाजाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, सिंधुदुर्ग डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर,नयना साळगावकर अनिकेत आसोलकर किसन धोत्रे अभिषेक लाखे,आपा राऊळ आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री गावडे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना फिटनेसची अत्यंत गरज असून, अशा मॅरेथॉन स्पर्धांच्या माध्यमातून ती पूर्ण होते. यामुळे मुलांना राष्ट्रभावनेची जोड मिळण्यासही मदत होते, या स्पर्धांमुळे एक चांगला स्तर निर्माण होईल आणि त्यातून चांगले अधिकारी घडतील, आपण इतर क्षेत्रांत पुढे असलो तरी स्पर्धा परीक्षांमध्ये काहीसे मागे आहोत. अशा स्पर्धा परीक्षा स्पर्धा आणि नियमित सरावामुळे आपण या क्षेत्रातही चांगली प्रगती करू शकतो. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक युवक आणि युवतीने प्रेरणा घेऊन भविष्यात आर्मी, वन विभाग किंवा इतर सरकारी विभागांमध्ये चांगले अधिकारी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावे श्री गावडे यांच्या उपस्थितीत यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील युवा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर,गेळे सरपंच सागर ढोकरे,कौस्तुभ मुंडये आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले तर आभार महेंद्र पेडणेकर यांनी मानले.