
दोडामार्ग : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शिरवल येथे वृक्षारोपण करून आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला. सर्वत्र वाढदिवस म्हटला की केक कापून वाढदिवस साजरा करतात मात्र दोडामार्ग राष्ट्रवादी कॉग्रेस च्या महिला तालुका अध्यक्ष सौ. धारिणी देसाई, तसेच इतर महिलांनी चक्क वृक्षा रोपण करून वाढदिवस साजरा केला. यावेळी धारिणी देसाई यांनी उपस्थितीत महिलांचे आभार मानून मा. खासदार सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .