
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे साटेली कदमवाडी येथे एका घराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
दोडामार्ग तालुक्यात मुसळाधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे साटेली कदमवाडी येथील राजन तांबडो कदम यांच्या राहत्या घराचा काही वेळी कोसळला. घराचा एक खांब कोसळल्याने वासे, कौले मोडून पडली. घरात राहणारे कुटुंब सुदैवाने सुरक्षित असून, आवाज ऐकून वेळेवर घराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक आघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच, तालुका प्रशासनाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाने या घटनेचा पंचनामा केला.