झोळंबे विठ्ठल मंदिर भक्त निवासाचं लोकार्पण

Edited by:
Published on: July 06, 2025 21:21 PM
views 139  views

दोडामार्ग : प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे झोळंबे येथील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाईचे आमदार दीपक केसरकर व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दर्शन घेऊन निवासस्थान नूतन वास्तूचे लोकार्पण केले. यावेळी आमदार दीपक केसरकर बोलताना म्हणाले की दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे सारख्या गावात विकासासाठी आपण भरपूर निधी दिला. येत्या दोन वर्षात दोडामार्ग तालुक्याचा कायापालट होणार आहे. महायुती सरकार म्हणून भरघोस असा निधी विकास कामांना दिला जाईल. माझ्या मतदारसंघात आठवड्याचे चार दिवस मतदार संघातील अडीअडचणी विकास कामे याकडे लक्ष देऊन मी काम करणार असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले.

आषाढी एकादशी निमित्त झळंबे येथील भक्त निवासस्थान नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की  अति दुर्गम असा भाग असलेल्या होळंबे गावात श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. हे इथल्या लोकांचे भाग्य आहे. झोळंबे गावात विकासाच्या दृष्टीने आम्ही युती सरकारच्या माध्यमातून भरघोस असा निधी दिलेला आहे. 50 किंवा 100 वर्षे झालेल्या मंदिरांना शासनाच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी निधी दिला जात आहे. माझ्या आमदार निधीतून या देवस्थानासाठी आपण दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करीत आहे. असे आमदार दीपक केसरकर म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत  जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माझी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, भाजप तालुकाप्रमुख दीपक गवस, दोडामार्ग नगरपंचायत चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण,  नगरसेवक संतोष नानचे, प्रकाश गवस, झोळंबे सरपंच विशाखा नाईक, कोलझर सरपंच सुजल गवस, भाजप महिला तालुकाध्यक्ष दीक्षा महालकर, सुधीर दळवी, आनंद तळणकर, बांदा भाजप पदाधिकारी शितल राऊळ, बाबा काणेकर, चंद्रशेखर देसाई, शिवसेना कार्यकर्ते सूर्यकांत गवस, भगवान गवस, रामदास मेस्त्री, गुरुदास सावंत, प्रवीण गवस, चंदू मळीक,  पराशर सावंत तसेच तालुक्यातील महसूल चे अधिकारी कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी यांचे झोळंबे देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत च्या वतीने शाल श्रीफळ व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मानित केले.

यावेळी भाविकांना आषाढी एकादशीच्या मनीष दळवी यांनी  शुभेच्छा दिल्या.  मंत्री नितेश राणे आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार होते. मात्र, काही कारणास्तव विकासाबरोबर इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून दिली तर येणाऱ्या भविष्यात इथला तरुण वर्गही शेतीकडे वळेल. असे मनीष दळवी बोलताना म्हणाले.