
दोडामार्ग : घोटगे - परमे गावात २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने ४५ हजार हुन अधिक केळी जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन खास बाब मधून नुकसान भरपाई देतो असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी देऊनही 5 महिने झाले तरी देखील इथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे पालकमंत्र्यांनी आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा अन्यथा आम्हाला आंदोलनासारखा पर्याय हाती घ्यावा लागेल असे घोटगेचे युवा शेतकरी विनय दळवी म्हणाले.
घोटगे गावचे शेतकरी दै. कोकणसाद व लाईव्ह शी बोलताना म्हणाले की 23 फेब्रुवारी 2025 रोजी. घोटगे, परमे आदी गावात अवकाळी पावसा बरोबर वाऱ्याने येथील शेतकऱ्यांच्या केळी बागायती भुईसपाट करून लाखो रुपयाचे नुकसान केले. शासनाच्या नुकसान भरपाई प्रमाणे प्रति झाड 10 रु एवढी नुकसान भरपाई नको आम्हाला वन्य प्राण्यानी नुकसान करतात व त्या प्रमाणे 240 रु प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. होती. व महसूल चे पंचनामे करण्यास विरोध केला होता. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी घोटगे येथील शेतकऱ्यांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व खास बाब म्हणून येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे चर्चा करून भरपाई देण्याचे प्रयत्न करू असे सांगितले
त्या नंतर यावीषयवार पालकमंत्री नितेह राणे यांची बांदा ग्रामपंचायत येथे भेट घेतली. व त्या नंतर मोर्ले येथे नुकसानी संदर्भात भेट घेतली. मात्र 5 महिने होऊन सुद्धा अद्याप पर्यंत आम्हा क्षेत्रकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून पालकमंत्री यांनी आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. आम्हाला नुकसान भरपाई नमिळाल्यास आम्ही घोटगे गावचे सर्व नुकसान ग्रस्त शेतकरि 15 ओगोस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी त्यांच्या सोबत सतीश परब, महेश दळवी, नरेश कळबेकर आदी शेतकरी उपस्थित होते.