
दोडामार्ग : हिंदी सक्तीबाबत GR सरकारने मागे घेतला, याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग शिवसेना व मनसेच्या वतीने दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात फटाके वाजवून व लाडू वाटप करून जल्लोष केला गेला. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या मुबई येथील सभेनंतर आज दोडामार्ग तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून फटाक्यांची आताशबाजी केली.
यावेळी दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, मनसे माजी तालुका अध्यक्ष सुनिल, गवस उपजिल्हा संघटक विजय जाधव, विभाग संघटक भिवा गवस, दरशथ मोरजकर, उपविभाग प्रमुख गणेश धुरी, सोशल मीडिया प्रमुख राणे, शुभंकर देसाई, श्याम खडपरकर, संजय गवस, संजय सुतार, आश्विन जाधव, रुपेश गवस, आप्पा उसपकर, सिद्धेश गवस आदी शिवसैनिक उपस्थित होते.