
दोडामार्ग : अचानक एसटी विभागाने सर्वत्र संप पुकारल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात अनेक प्रवाशी ठिकठिकाणी अडकून पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र वस्ती साठी असणारे एसटी बस तालुक्यात सुरु होते. त्यामुळे प्रवाशांना काहीच समजेना ऐन गणेश चतुर्थी सणावेळी नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली.
मंगळवारचा दिवस उजाडला आणि वस्तीच्या एसटी बसने गावागातील लोक बाजार किंवा तालुकाच्या ठिकाणी गेले. परत घरी जाण्यासाठी बसस्थानक वर एसटीची वाट पाहत बसलेले नागरिक एसटी स्थानक किंवा बाजाराच्या ठिकाणी अडकून पडले. नेमक प्रवाशांना समजेना एसटी बस कुठे अडकून पडल्या ? हळू हळू समजू लागलं की आज एसटी ने संप पुकारला तेव्हा लोकांची एकच तारांबळ उडाली. बाजाराच्या ठिकाणी आलेले लोक रिक्षा किंवा सहा आसनी रिक्षाने आपला बाजार घेऊन घरी गेले. मात्र काही प्रवाशी बस स्थानकातच बसून राहिले.