
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीत आयोजित शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पुस्तक रसग्रहण स्पर्धेत नूतन विद्यालय कळणेचे मराठी विषय शिक्षक तथा साटेली गावचे सुपुत्र सतीश अंकुश धर्णे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या "झेंडूची फुले" या काव्यसंग्रहावर परिक्षणात्मक विचार व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रविण बांदेकर, ज्येष्ठ कवयित्री उषा परब, जाणकार वाचक विजय ठाकर, सौ.खानोलकर मॅडम आदी उपस्थित होते. त्यांना २८ डिसेंबर रोजी सावंतवाडीत होणाऱ्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवयित्री "नीरजा" यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धचे परिक्षण प्रा.हर्षवर्धिनी जाधव व प्रा.संतोष पाथरवट यांनी केले.सतीश धर्णे यांनी या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष एम. डी.देसाई सर यांना दिले आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक उपक्रम राबविले असेही ते म्हणाले.त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष एम.डी.देसाई, संस्था सचिव गणपत देसाई,मुख्या. महेंद्र देसाई, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.











