
दोडामार्ग : वन्य हंत्तीकडून घोटगे गावात दिवस रात्र नुकसानी सुरूच आहे गुरुवारी रात्री खालची वाडी येथील प्राथमिक शाळेवर बीमला माड हत्तीनी कोसळून घातला त्यात शाळेचे छप्पर कोसळल्याने शाळेमधील कॉम्पुटर सामानाची मोठे नुकसान झाले. सदर नुकसाणीची पाहणी करून तात्काळ छप्पर दुरुस्थी व कॉम्पुटर द्यावे अशी मागणी घोटगे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
गेल्या महिन्यापासुन घोटगे, घोटगेवाडी, परमे आदी गावांत 5 हत्तीचा कळप मोठ्या प्रमाणात नुकसानी करत आहे. वनविभागाची हाकारी टीम, व वनविभागा कर्मचारी याठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही घोटगे तील शेतकऱ्यांनी केला होता. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार ही दिली होती. घोटगे गावात पाच हत्तीचा कळप गेल्या महिन्या भरापासून ठाण मांडून आहे. शेतकऱ्यांच्या काजू बागायती, बांबू, केळी, भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. या हत्तीचा कळप लोकवस्थित येऊ लागल्याने इथले ग्रामस्थ भयभीत झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ या हत्तीना दुसऱ्या ठिकाणी हलवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गावकऱ्यांसह शाळेतील मुलांमध्ये भीतीचे वातावरण...
घोटगे गावात थांड मांडून असलेल्या पाच हत्तीच्या कळपामुळे इथले गावकरी व शाळकरी मुले भयभीत झाली आहेत. हंत्ती थेट शाळे पर्यंत येऊन पोहचला आहे. आणि दिवसा ढवळ्या हत्तीचा वावर लोकवस्थित असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.