
सावंतवाडी : महावितरणचा अजब कारभार सुरू आहे. काल बांद्यात व आज सावंतवाडीत पोलवरून शॉक लागून पडल्याने कर्मचारी गंभीर झाले आहेत. जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. आजवर ९ मुलं मयत पावलीत. अनेक जण अपघात होऊन घरी बसलेत. त्यामुळे उगाच अती करू नका, उद्रेक होईल असा इशारा त्यांनी महावितरणला दिला. हा विषय सोडणार नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर जिल्हा नियोजन बैठकीत मांडणार अस ते म्हणाले. कंत्राटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ना महावितरण ना कंत्राटदार घेत नाहीत. त्यामुळे तुमची जबाबदारी सांगा, याबाबत निर्णय घ्या. अन्यथा सोडणार नाही असा इशारा श्री. सावंत यांनी दिला. उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांना त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
महावितरणचे कंत्राटी कर्मचारी घननील मिशाळ यांची विचारपूस केल्यानंतर अशोक सावंत यांनी महावितरण अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. कर्मचारी वर्गाने दक्षता घेतलीच पाहिजे. परंतु, काम करताना तुमचा तज्ञ कर्मचारी सोबत हवा की नको ? लाईनवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुम्ही पोलवर चढवत असाल तर त्यांची जबाबदारी महावितरणने घेतली पाहिजे. या प्रकारांमुळे आजवर ९ मुलं मयत पावलीत. अनेक जण अपघात होऊन घरी बसलेत. त्यामुळे उगाच अति करू नका, उद्रेक होईल असा इशारा दिला. हा विषय सोडणार नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर जिल्हा नियोजन बैठकीत मांडणार आहे. जिल्ह्यातील अपघात व मयतांची महावितरणने कोणती जबाबदारी घेतली आहे ? कंत्राटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ना महावितरण ना कंत्राटदार घेत नाहीत. त्यामुळे तुमची जबाबदारी सांगा, याबाबत निर्णय घ्या. अन्यथा सोडणार नाही असा इशारा दिला. यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दक्षता घेऊ व निर्णय घेऊ असं आश्वासन दिले.
अशोक सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचा कारभार अजब आहे. बांद्यात कर्मचारी पोलवरून पडला. आज सावंतवाडीत घटना घडली. महावितरणचे अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. ज्याच्यावर प्रसंग येतो त्या कुटुंबाच दुःख या अधिकाऱ्यांना समजत नाही. त्यांना कोण वारस राहत नाहीत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना सुचना केलेल्या आहेत. तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. साडेपाचशे कंत्राटी कामगारांची जबाबदारी त्यांनी घ्यावी यासाठी लक्ष वेधलं आहे. त्यांना एक महिन्यात न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तज्ञ वायरम असतानाच कंत्राटी कर्मचाऱ्यांना पोलवर चढवाव. कारण, कंत्राटदारांना पोलवर चढवायचे अधिकार नाहीत. महावितरणचे अधिकारी सुद्धा तस सांगत आहेत. त्यामुळे या कंत्राटी मदतनिसाना वर चढवायचे की नाही यावर निर्णय घ्यावा. अन्यथा सगळे कर्मचारी एकवटून न्याय मागतील असं मत अशोक सावंत यांनी व्यक्त केले. तर कोकणचे नेते, खासदार नारायण राणे व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही या विषयाकडे लक्ष वेधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे असं सांगितलं.