'त्या' खांबाचे स्ट्रक्चरल ऑडीट करा

हेल्पलाइन फाऊंडेशनची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: August 29, 2023 15:53 PM
views 248  views

सावंतवाडी : पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज पुतळ्या जवळील वीज व्यवस्थेसाठी उभा असलेला सिमेंटचा खांब जीर्ण झाला असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावा, आवश्यकता असल्यास स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अन्यथा तो खांब पाडून टाकावा अशी मागणी हेल्पलाइन फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्योजक तथा सदस्य राजन आंगणे, माजी नगरसेवक महेश सुकी, बंड्या नेरुरकर व जितेंद्र पंडीत यांनी केली आहे. .


 २३ वर्षापुर्वी एका सामाजिक संस्थेकडुन मोती तलावाच्या परिसरात उजेड पडावा यासाठी हा सिमेंटचा खांब उभारण्यात आला होता. मात्र तो आता जीर्ण झाला आहे. त्यामुळे तो कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात बापुसाहेब महाराजांचा पुतळा आहे. तर त्या ठिकाणी छोटे उद्यान असल्यामुळे अनेक नागरिक पहाटे दुपारी किंवा सायंकाळी सावलीत बसलेले असतात. त्यामुळे खांब कोसळल्यास एखादा अपघात होवू शकतो. त्यामुळे याबाबत पालिकेने तात्काळ दखल घ्यावी, आवश्यकता भासल्यास त्या खांबाचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अन्यथा तो धोकादायक आहे. हे लक्षात येते त्यामुळे तो तात्काळ पाडून टाकण्यात यावा त्याच बरोबर परिसरातील उद्यानात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.